बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो….’; चंद्रकांत पाटलांचा इशारा

पुणे | राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे पहिल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची तुंबई झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईत झालेल्या तुंबईमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

गेली 20 वर्षांहून अधिक कालावधी मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता आहे. दीड वर्ष झाले राज्यातही सत्ता आहे. 40 हजार कोटींचं बजेट असतं. 58 हजार कोटींच्या एफडी आहेत पण मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहेत. कितीजण मुंबईतील पावसात मॅनहोलमध्ये पडतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर जो काही धडा शिकवायचा आहेत ते शिवसेनेला शिकवतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर आपण टिप्पणी करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी मला मनाविरुद्ध का होईना शुभेच्छा दिल्या आहेत. आठवड्यातील सात दिवसांपैकी एक अग्रलेख माझ्यावर असतो. काल मी एका कार्यक्रमात असताना मला एक पुस्तक आणि एक वाघ दिला. तर मी म्हटलं फार चांगलं झालं वाघांशी तर आमची दोस्ती असल्याचं पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-  

नरेंद्र मोदी देशातील आणि भाजपचे सर्वात मोठे नेते- संजय राऊत

कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास मेंदुवरही होऊ शकतो परिणाम!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून स्थानिक नागरिक आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! एका झाडावर घेतलं 22 जातींच्या आंब्यांचं उत्पादन

सुशांतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, बायोपिक प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More