बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर अजिबात नाही”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांनी पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा चालू आहेत. सध्या संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेणार असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड काही आमचे दुश्मन नाहीत आणि शिवसेना तर आमची बिलकुल दुश्मन नाही. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गुन्हेगाराला शासन होतं हे सामान्य लोकांना वाटत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड यांना क्लीन चीट देणं चिंताजनक आहे. संजय राठोड यांच्याबाबतची जनहित याचिका कोर्टात आहे. हा न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचा विषय आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं की घेऊ नये हा शिवसेनेचा विषय आहे. त्यांच्यावर आरोप आहेत की नाही हे चारही बाजूने पाहून घ्या, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांना जबाब दिला. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही, असा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

ईडीची अनिल देशमुखांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्या कोटींची संपत्ती जप्त

शुभमंगल सावधान! अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात

“तिसऱ्या लाटेला सामोरे जायला आपण सज्ज असलो, तरी पुण्यातील निर्बंध कायम राहणार”

“बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील”

‘पुण्याची मस्तानी जगात भारी, तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More