बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”

पुणे | शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर देत भाजपवर निशाणा साधला होता. राऊतांनी केलेल्या टीकेवरून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर राऊतांनी पाटलांना प्रत्यत्तर दिलं होतं.

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. यावरून पुन्हा एकदा पाटलांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

अनाथांना 1 टक्के आरक्षण मिळणार?; आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

‘ही’ लक्षणं दिसताच व्हा सावध ‘हा’ फंगस फुफ्फुसांपर्यंत पोहोचत तयार करतोय लंग बॉल

“शिवसेना विश्वास असणारा पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्दही पाळला होता”

15 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले ‘या’ तरूणीचे तांडव नृत्य; पाहा अंगावर रोमांच आणणारा व्हिडीओ

“चंद्रकांत पाटील आपल्या मतावर ठाम नसतात, त्यांची मतं रोज बदलतात”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More