बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावं, मग तुम्ही काय झोपा काढताय?- चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही मोठ्या संख्येेने वाढत आहे. कोरोना आहेच तर त्यासोबत आता ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावरून राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

तुमच्या राज्यात रेमडेसिवीर निर्मिती करण्याच्या कंपन्या तुम्ही त्यांना सहकार्य करुन क्षमता वाढवू शकतात. ऑक्सिजन तर 100 टक्के निर्मिती करु शकतात. पुणे मनपाकडून सोमवारपासून ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. महिन्याभरात जेवढे रुग्णालय आहेत त्यांना इतरांकडून ऑक्सिजन घेण्याची गरज पडणार नाही. जर पुणे महानगरपालिका करु शकते तर सरकार काय जोपा काढत होत का?, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

प्रत्येक विषयात जर केंद्र करणार असेल, लसीच्या बाबतीत जर आपण केंद्रावर अवलंबून असू पण केंद्राने आता तुम्हाला मोकळीक दिली आहे तुम्ही महाराष्ट्रात निर्मिती करु शकतात, इतर राज्यांतून, देशातून आणू शकतात. तशाच प्रकारे ऑक्सिजनचं आहे. ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होतं काय़?, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जगातील वेगवेगळे देश आपल्याला मदत करत आहेत. तुम्ही जर म्हणाल की आमच्या देशातलं आम्ही बाहेर देणार नाही. जगात ज्यावेळी तुम्हाला प्रमुख देश म्हणून काम करायचं असतं त्यावेळी अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करायची असते. मी इतकच सांगेल की अजितदादां एवढं ज्ञान मला नाही, असा टोलाही पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात फार्महाऊसवर नाचगाणं, पैशांचा पाऊस अन् पोरी, पोलिसांची रेड पडदाच गदारोळ

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही- नाना पटोले

“…तर भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करेल”; गुलाबराव पाटलांचं महाजनांना आव्हान

विनाकारण घराबाहेर फिरत होत्या मुली, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ-

न्यूज इंडस्ट्रीला मोठा धक्का! रोहित सरदाना यांच्यानंतर लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More