बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंनी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं”

मुंबई | मुख्यमंत्रिपद हा उद्धव ठाकरेंचा रोल नाही. त्यांनी संघटना सांभाळावी आणि मुख्यमंत्रिपद हे वर्षानुवर्ष जे आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत अशा कोणाला तरी द्यायला हवं होतं. म्हणजे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे ही नावं असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तो एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंचं कामच नाही. कारण त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, एकदा आमदार, दोनदा आमदार असं करत करत सर्व शिकावं लागतं. सर्व छक्के-पंजे शिकावं लागत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तुम्ही शिकत शिकत वर जात नाही तेव्हा तुमच्या करिअरला फटका बसतो, असं म्हणत पाटलांनी उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे सरळ आहेत, प्रेमळ आहेत. पण सरकार चालवण्याचं कौशल्य त्यांनी मिळवलंय असं वाटत नाही. ते कोणतेही उत्तर परिपूर्ण देत नसल्याचंही पाटलांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्रिपद सांभाळणं उद्धव ठाकरेंचं काम नाही; चंद्रकांत पाटलांची विखारी टीका

अखेर सरपंचाची ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी

महत्वाच्या बातम्या-

पोरीनं आई-बापाचं पांग फेडलं; पहिल्याच प्रयत्नात बनली पीएसआय!

राहुल गांधींनी कोरोनाची तपासणी केली; काँग्रेसचं भाजपला उत्तर

अनावधानाने काही वक्तव्य केलं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो- इंदोरीकर महाराज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More