जळगाव महाराष्ट्र

कोण आहे ‘तो’ भाजपचा नेता, फक्त त्यानंच एकनाथ खडसेंना फोन केला!

जळगाव | माझ्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांसोबत राहण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी भाजपचा त्याग केला, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

मी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही मला फोन केला नाही. कुणीही माझी मनधरणी केली नाही, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मी कधीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली नाही. केंद्रीय नेतृत्वावर आणि प्रदेश भाजपवर मी नाराज नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात खालच्या स्तरावर राजकारण केलं. त्यामुळे मी भाजपचा राजीनामा दिला आहे, असंही खडसेंनी सांगितलं आहे.

एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप सोडल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले

भाजप सोडताना एकनाथ खडसे आक्रमक; देवेंद्र फडणवीसांवर केले ‘हे’ धक्कादायक आरोप

भाजपचे ‘इतके’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार- जयंत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या