बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत – चंद्रकांत पाटील

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीतील प्रचार प्रमुख शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर (Nitesh Rane) आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी नितेश राणेंवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहे.

नितेश राणेनंतर आत नारायण राणेही अडचणींत सापडले आहेत. नारायण राणेंना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली. याप्रकरणी सगळ्यांनीच वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांनीही राणेंवर वक्तव्य केलं आहे.

नारायण राणे हे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांचं या वक्तव्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कृत्रिमरित्या आलेलं आहे. लोकांनी त्यांना कौल दिला नव्हता. विद्यापीठ सुधारणा कायदा ज्याप्रकारे समंत करुन घेतला तो नियमांना धरून नव्हता. नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

‘याचं नाव घ्या आणि त्याचं नाव घ्या, लग्न बिघ्न आहे का माझं?’; अजित पवार संतापले

“पंतप्रधान मोदी मास्क लावत नाही म्हणून लोकही मास्क लावत नाहीत”

Corona: ‘मुंबईच्या बाहेरुन येणारी लोकं शिस्त बिघडवतात’; किशोरी पेडणेकर भडकल्या

Corona : कोरोना होऊ नये म्हणून घेतले 4 डोस, तरीही शेवटी…

WHOनं वाढवलं जगाचं टेंशन; ‘कोरोनाची त्सुनामी येणार अन्…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More