“लोकसभेत सर्वात जास्त मेहनत घेऊन उद्धव ठाकरेंना काय मिळालं?”

Chandrakant Patil | लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. शरद पवार गट, कॉँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवरच बोलताना भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना डिवचलं आहे.

मविआ नेते नेहमीच सरकार पाडण्याविषयी बोलतात, पण त्याचा काही फरक पडला नाही, आता विधानसभा तीन महिन्यांवर आलेली आहे, त्यामुळे त्यांनी म्हटलं म्हणून काय होणार आहे असं काहीही नाही, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे”

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लोकसभेत मिळालेल्या जागेवरूनही मोठं भाष्य केलं. लोकसभेमध्ये सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली, पण काय मिळालं, त्यांच्या हाताशी काय लागलं?, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांना डिवचलंय.

“लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक मेहनत ही उद्धव ठाकरे यांनी घेतली. काही ना काही आजारपणं असतात, तशी त्यांचीही आजारपणं होती. पण ते खूप फिरले. त्यांना 9 सीट मिळाल्या आहेत. 2019 ला सरकार कंटिन्यू राहिलं असतं तर, युतीदेखील कंटिन्यू झाली असती. यावेळी त्यांना 8 सीट्स मिळाल्यात. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.”, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपला फायदा करून घेतला”

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मनसेच्या एका नेत्यांनं ट्वीट केलं की, हा भगवा विजय नाही, तर हा हिरवा विजय आहे. हे एका बाजूला झालं, पण दुसऱ्या बाजूला सीट्स 18 च्या नऊ झाल्या आहेत. तिसऱ्या बाजूला ते जर एकत्र राहिले असते, तर आज जी वाताहात झालीये ती झाली नसती, त्यामुळे यांच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपला पक्का फायदा करून घेतला आहे.”, असा टोला देखील यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला.

तसंच उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही, पण त्यांनी मी काय मिळवलं? हाताशी काय लागलं? याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. असा खोचक सल्ला देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना दिला.

News Title –  Chandrakant Patil Target Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

“गोड बोलून माझा काटा काढण्याचा..”; मनोज जरांगेंचा अत्यंत गंभीर आरोप

शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावूक, म्हणाले…

अजित ‘दादा’ धोक्यात!, शरद पवारांकडे पोहोचलेल्या कार्यकर्त्यांची मोठी मागणी

अब्दूला लग्नापेक्षाही ती गोष्ट फार महत्वाची; अब्दू रोजिकने लग्न पुढे ढकलण्यामागे हे आहे कारण

पैसे तयार ठेवा, या भन्नाट फीचर्ससह इलेक्ट्रिक कार लाँच होणार