बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसने राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. राज्यातील वातावरण तापलं असताना राज ठाकरेंच्या अस्तित्वावरून काँग्रेसने (Congress) टीका केली होती.

राज ठाकरे यांचं अस्तित्व धोक्यात येईल, असं वक्तव्य काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं होतं. बाळासाहेब थोरातांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंचं अस्तित्व धोक्यात येईल असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. मात्र, त्यांनी आधी स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करावी, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. भाजपचा अजेंडा बाळासाहेब थोरात यांनी राबवला तरी आम्ही स्वागत करू, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. त्याआधी 1 मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहिर सभा घेणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष त्या सभेकडे लागलं आहे. तर या सभेला परवानगी मिळाली नसती तर ती झाली नसती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंच्या सभेआधी भीम आर्मी आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

संतापजनक! मदतीसाठी पोलिसांकडे गेलेल्या महिलेसोबत घडलं असं काही की….; पाहा व्हिडीओ

चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर

मोठी बातमी ! राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती आली समोर

‘कोणीही मशिदींवरील भोंगे काढायला आलं तर…’, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More