“शरद पवार भाजपला घाबरतात, एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते”
पुणे | राज्यातील वातावरण तापलेलं असताना भाजप (BJP) आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) अनेक मुद्द्यांवरून जुंपलेली पाहायला मिळत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते सातत्याने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीवर आणखी एकदा थेट प्रहार केला आहे. महाविकास आघाडीची मर्यादा नाही अशी दादागिरी सुरू आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) जे बोलत आहेत ते योग्य आहे. महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहे, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
शरद पवार भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत नाही. एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते हे कोल्हापूरला दाखवलं, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर ते एकत्र लढले तरी 96 हजार आणि आम्हाला 78 हजार मतं मिळाली, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, याला उचल, त्याला पकड, खोट्या केसेस टाक आणि शेवटी महापालिका ताब्यात आहे म्हणून घराला नोटीस पाठव असं सगळं सुरू आहे. अशी सगळी दादागिरी सुरू आहे, असा आरोप देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिला नाही”
प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन
‘…तर आज राज ठाकरे सुद्धा मुसलमान असते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता ‘या’ गोष्टीसाठीही मोजावे लागणार पैसे
“…त्यांना मी परवडणार नाही”, बॉलिवूडबद्दल महेश बाबू बेधडक बोलला
Comments are closed.