बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर 30 आमदारांचे तिकीट कापणार; भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा इशारा

गांधीनगर | देशातील आगामी वर्षात पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पाच राज्यांपैकी गुजरातमध्ये देखील विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. भाजप आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार कंबर कसताना दिसत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 30 आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते, असा थेट इशारा गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले आहेत की, पक्षाने आता नो रिपीट थेअरी लागू केली आहे. सध्या भाजपचे 100 आमदार गुजरात विधानसभेमध्ये आहेत. त्यानुसार काही विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं जाऊ शकतं. आज तक’ने ही माहिती दिली आहे.

गुजरात विधानसभेमध्ये एकूण 182 जागा आहेत. त्यात सत्ताधारी असलेल्या भाजपकडे 70 पैैकी 30 जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. म्हणजेच 30 नवीन आमदारांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी भाजपने गुजरातमधील मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी गंच्छती केली होती. त्यानंतर सर्व नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली गेली. त्यानंतर आता आगामी काळात खरंच आमदारांना घरी पाठवलं जाऊ शकतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“कुणीही येईल आणि तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल”

सचिनच्या लेकीचा फोटो, अभिनेत्याचा एक लाईक अन् नव्या चर्चांना उधाण

“ज्यांची बुद्धी कमी असते, त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही”

काजू-बदाम कशाला??? फक्त शेंगदाणे खा… होतील फायदेच फायदे

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More