बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी औरंगाबादला आले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांकडे पाहून भावी सहकारी असा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात अनेक राजकीय चर्चांना उधान आलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेत काही नेते येण्याची शक्यता आहे, कारण मला तशी राजकीय गडबड दिसत आहे. त्यामुळे पाटील आणि दानवे हे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

महाविकास आघाडीमध्ये कसलेही मतभेद नाहीत. तसेच आमचं सरकार स्थिर आहे. मागील दोन वर्षापासून भाजप नेते सरकार पडणार, असंच बोलत आहेत. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असंही पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

दरम्यान, काल नंदुरबार येथे सहकार महर्षी पी.के.आण्णा पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीतून या कार्यक्रमास आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चांना उधान आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणंच बाकी ठेवलंय”

61 वर्षाच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी अन्….

पंजाबचा नवा ‘कॅप्टन’ कोण? ‘या’ दोन नेत्यांची नावं चर्चेत

…अन् एका क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, पाहा व्हिडीओ

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

निष्काळजीपणा जीवावर बेतला, कोरोना टेस्ट करताना किट घशात अडकल्याने महिलेचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More