बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली. नवाब मलिकांवरील कारवाईनंतर राजकीय वातावरणात चांगलीच गरमागरमी पाहायला मिळत आहे.

राज्यातलं राजकारण तापलं असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ईडीच्या आणखी कारवाया होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ज्या दिवशी 93च्या बॉम्बस्फोटानंतर नेमलेल्या समितीचा अहवाल बाहेर येईल, त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही. तसेच तुरूंगातही त्यांच्यासाठी जागा मिळणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांचं हे मोठं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनीही काही मविआ नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे आता खरंच आणखी कोणत्या नेत्यावर कारवाई होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसैनिकाची ऐनवेळी मास्कमुळे तारांबळ, व्हिडीओ तुफान व्हायरल

अमृता फडणवीसांचं ‘तांडव’, नवं गाणं होतंय तुफान व्हायरल

पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष पुतीनला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

“या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून…”

 “ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More