मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेवरुन आज विधानसभेत चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. मराठा समाजाच्या तरुणांचं आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला.
मराठा समाजाचे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रश्नातून काही मार्ग निघत नाही. अजित पवार ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसा त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथविधी झाला. असाच निर्णय त्यांनी मराठा आंदोलक तरुणांबाबत घ्यावा असं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. यावर दोन-तीन दिवसात मराठा आंदोलकांबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ. त्यात काही वेगळे मुद्दे असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
चंद्रकांतदादा तुम्ही म्हणाला रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथ…. असं अजित पवार म्हणत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी मध्येच हस्तक्षेप केला. तुम्ही (अजित पवार) त्यांच्याकडे (चंंद्रकांत पाटील) लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही, असं फडणवीस म्हणाले.
एकीकडे पहाटेला झालेल्या शपथविधीवेळी नेमकं काय झालं?, हे राज्यातील जनतेला पवार सांगणार होते पण फडणवीसांनी त्यांना रोखल्यामुळं ते रहस्य रहस्यच राहूण गेलं.
ट्रेंडिंग बातम्या-
दुसऱ्याला वाचवायला जाऊन माझ्या मुलानं जीव गमावला; आयबी अधिकाऱ्याच्या आईची प्रतिक्रिया
‘प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला’; खासदारकी वाचवण्यासाठी जयसिद्धेश्वरांची धडपड
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून डॉन अरुण गवळीला न्यायालयाकडून पॅरोल मंजूर
‘येसूबाईं’ना नाही आवरेना लाठीकाठी खेळण्याचा मोह; पाहा व्हिडीओ
कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे- अनिल देशमुख
Comments are closed.