शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा घुमजाव
नांदेड | महाराष्ट्रातील राजकारणात टीकाटीप्पनीला चांगलंच उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत वक्तव्य केलं होतं.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोडही उठली आहे. तसेच या प्रकरणात आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत झालेल्या घटनेची सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं. देगलूर येथे विधानसभा पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ नांदेड गाठलं आणि त्याचवेळी आपल्यावर हबोत असलेल्या टीकेवरही भाष्य केलं. ‘शरद पवारांबद्दल मला आदर आहे, खासगी कार्यक्रमात त्यांच्याबद्दल आपण चुकून बोललो’, अशी सारवासारव त्यांनी केली आहे.
पुणे येथील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावेळी थोडेच कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यावेळी चुकून शरद पवारांबद्दल आपण बोलून गेलो, असं म्हणत त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे. त्याचबरोबर संजय राऊतांना यावेळी कोपरखळ्या मारत राऊतांनी याचा बाऊ करू नये, उद्धव ठाकरेंना जर मी काही बोललो तर त्यांनी बोलावं, असं म्हणत चांगलंच फटकारलं आहे.
थोडक्यात बातम्या –
रिझर्व बँकेची एसबीआयवर मोठी कारवाई, ठोठावला तब्बल एवढा दंड
राज्यात आणि देशात काॅंग्रेस सक्षम पर्याय! नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
पाणीपुरी खवय्यांसाठी खुशखबर! पाणीपुरी खाल्ल्यानं होतो आरोग्याला फायदा
अन् चक्क मंत्र्यांचा हरवलेला चश्मा सापडला महिला उमेदवाराच्या केसात, पाहा व्हिडीओ
“नरेंद्र मोदी सरकारने सार्वजनिक मालमत्ता विकल्या”
Comments are closed.