Top News कोल्हापूर महाराष्ट्र

‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही’; आपल्या मूळ गावात झालेल्या पराभावनंतर पाटलांची प्रतिक्रिया

Photo Credit- Chandrakant Patil Facebook Page

मुंबई | 15 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या गावातील खानापूर ग्रामपंचायत गमवावी लागली आहे. यावर पाटलांनी प्रतिक्रिया दिली  आहे.

भाजपनं खानापूरमधील आपली जागा घालवली आहे. त्यामुळं पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. मात्र पाटील यांनी हा दावा सपशेल फेटाळून लावला असून एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,” खानापूरमध्ये सहा पैकी तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहे. पण तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.”

दरम्यान, खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने 9 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केली आघाडी तरीही सेनेने भगवा फडकलाच

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत”

अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण… -निलेश राणे

“धनंजय मुंडेंबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या