“…अन् मी बसल्या बसल्या अजित पवारांना पत्र लिहिलं”
मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या एसटी संपावरून विरोधक आक्रमक होत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एसटी संपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सरकारनं स्विकारला आहे. एसटी विलिनीकरण शक्य नसल्याचं समितीनं म्हटलं आहे. एसटी संपाचा तिढा सोडवण्यास फक्त अजित पवार सक्षम असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
परवा मी सभागृहात बसल्या बसल्या अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यांना एसटीच्या प्रश्नात लक्ष्य घालण्याचं सुचवलं आहे, असं पाटील म्हणाले आहेत. अजित दादांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, असं पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून प्रवासी वाहतूक खोळंबली असल्यानं राज्यातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. एसटी ही ग्रामीण अर्थकारणाला गती देणारी व्यवस्था आहे.
थोडक्यात बातम्या –
“मला वाटतं खूप काहीतरी होणार आहे”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ
“अजितदादा तुम्हीच राज्य चालवताय, मुख्यमंत्री कधीतरी दिसतात”
राजमौलींच्या ‘RRR’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड
“संजय राऊतांचं ‘हे’ वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे”
“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं, कोणाचीही नोकरी जाणार नाही”
Comments are closed.