बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात या खास पाहुण्याची हजेरी

सातारा | महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलांच्या कार्यक्रमात चक्क एका वानराने हजेरी लावली होती. ते एका उद्घाटनाच्या समारंभासाठी साताऱ्यात गेले होते. 

चंद्रकांत पाटील हे ज्या स्टेजवर होते त्याच स्टेजवर ते वानर येऊन बसले होते. त्यावेळी स्टेजवरील इतर मंडळी आणि कार्यक्रमात आलेले नागरीक पुरते घाबरुन गेले होते.

वानराने स्टेजवर बऱ्याच हरकती केल्या पण कोणीही त्याला हुसकावण्याचे धाडस केले नाही. त्याने कोणालाही काही इजा केली नाही.

दरम्यान, काही वेळाने त्या वानराने स्टेजवरुन स्वत:हून रजा घेतली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

महत्वाच्या बातम्या-

-जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस देणार अ‌ॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी!

-अजिंक्य रहाणेनं घेतला अप्रतिम कॅच; व्हीडिओ व्हायरल

-होय… मला मलायका आवडते; या क्रिकेटपटूनं दिली जाहीर कबुली

-तुला झेपत नसेल तर तू शिकू नकोस; विनोद तावडेंनी विद्यार्थ्याला सुनावलं

-शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळणार पगार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More