बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर राष्ट्रपती राजवट स्विकारावी अन् सगळा कारभार केंद्राकडे द्यावा”

मुंबई | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मोठ्या गोंधळाच्या वातावरणात सुरू झालं आहे. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये जोरदार कलगीतूरा रंगला आहे. ओबीसी आरक्षणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हण यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलंय. अशात पाटील यांनी एक खळबळ माजवणारं वक्तव्य केलं आहे.

केंद्र सरकार ओबीसी आरक्षणावरून राज्यावर अन्याय करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून भाजपवर केला जात आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी चव्हाण यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर, आपण काही करायचं नाही, केंद्राच्या नावानं गळे काढणं थांबवायचं नाही, असा प्रकार महाविकास आघाडीनं चालवलाय, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

ठाकरे सरकारला जर काहीच करता येत नसेल, तर राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, सगळाच कारभार केंद्राकडे द्यावा आणि त्यांच्याकडून कामं होण्याची अपेक्षा करावी, अशी जहरी टीका पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण जोरदार पेटलं आहे. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच सामना रंगला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर राज्य सरकारवर ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून प्रचंड मोठा दबाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारनं आरक्षणासाठी महत्त्वाचा डाटा गोळा करण्यासाठी कोट्यावधींची तरतूद अधिवेशनात केली आहे.

थोडक्यात बातम्या 

काँग्रेसचा मंत्री बदलणार???, सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

OBC Reservation: हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

“राज्य विकणं म्हणजे चहा विकण्यासारखं वाटलं का?”

लसीकरण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

राहुल गांधी म्हणतात,”प्रभू श्रीराम म्हणजे न्याय आहे, धर्म आहे आणि सत्य आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More