बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना एक इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे चंद्रकांत पाटील अजित पवारांवर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार हे चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’ असा करतात. त्यावरूनच चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

‘अजित पवारांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेन’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचं रण सध्या चांगलचं पेटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील एका सभेत अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

पंढरपूर येथील शिवाजी चौक येथे आयोजित एका सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केला होता. त्यावरून आता चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाले असून मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेल, असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितलं की, खूप दिवस मला चंपा म्हणनं त्यांच्या लोकांकडून थांबवण्यात आलं होतं, कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेल असं सांगितलं होतं. पण आता जर हे थांबलं नाही तर त्यांचे त्यांच्या मुलापासून मला शॉर्ट फॉर्म काढावे लागतील, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कडक सॅल्यूट! डॉक्टरचा मनाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रेमडेसिवीर मिळेना; हतबल आमदार महेश लांडगेंनी मागितली जनतेची माफी

‘त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; अमोल कोल्हे भाजप नेत्यांवर बरसले

गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवा देखील बंद करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

हुंड्यामध्ये बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाने भर वरातीत काढले कपडे अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More