राम कदमांनी माफी मागितली, विषय संपला- चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजप आमदार राम कदम यांनी माफी मागितली आहे, त्यामुळे आता हा विषय संपला, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ते मुंबईत बोलत होते. 

एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय? आणि जरी चुकीचा अर्थ निघत असेल तरी त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळं हा विषय संपवायला हवा, असं चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, लोकप्रतिनिधींनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. एखाद्या वाक्याचा काय अर्थ होतो हे दाखवताना माध्यमांनीही योग्य प्रकारे दाखवलं पाहिजे, असं म्हणत या प्रकरणाचं खापर त्यांनी मीडियावर फोडलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करा, नाहीतर महिला आत्मदहन करतील!

-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचं ‘झंडू बाम वाटप’ आंदोलन

-जिओ फोन 2 बाजारात; एवढी कमी किंमत एेकून थक्क व्हाल!

-…अखेर राम कदम नमले; ट्विटरवरून मागितली माफी

-…अखेर महिला आयोगाला जाग; राम कदमांना पाठवली नोटीस

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या