बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा

मुंबई | जगात जे जे काही गुन्हे आहेत. ते गुन्हे राज्यातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी जोडले गेले आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर लगावला आहे. राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं असून कुणालाच कुणाचा धाक उरला नाही, अशी टीकाही भाजप कार्यकारणीच्या बैठकीत पाटलांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले की, कॉन्टेबलला मारहाण करायचं कारण असो तर कुणाचं नाव दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाशी जोडलं गेलंय . कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागतो. राज्यात असं सर्व काही सुरु असताना या गुन्ह्याशी कोणता ना कोणता गुन्हा राज्यातील मंत्र्याशी जोडला गेलाय.

हातून गुन्हा घडलेेल्या मंत्र्यांना संरक्षण देण्यात येत असून या मंत्र्यांना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातोय. या घटनांमुळे राजकीय नेतेच काहीही करत असतील तर आपलं कुठे काय बिघडलं? अशी जनतेची मानसिकता होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या राज्यघटनेप्रमाणं राजकाण हे समाजकारणाचं माध्यम आहे. मात्र राजकीय नेतेपदी असल्यानं तुमचं कुणीच वाकड करु शकत नाही, अशी बोचरी टीका करायलाही पाटील यावळेस विसरले नाहीत.

दरम्यान 14 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिम्मीत भाजपकडून दोन लाख मेणबत्त्या पेटवून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असल्याचंही पाटलांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. राज्यातील जवळपास 97 हजार बुथवर बाबासाहेबांच्या फोटोला मानवंदना देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

…तर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही- संजय राऊत

चांगली खेळी करुनही पदरी निराशा, ‘सुंदर’चं शतक थोडक्यात हुकलं

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश

स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More