बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प”

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर भरलेल्या स्फोटकांची गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा तपासादरम्यान त्यांचा मृतदेह सापडला. अचानक मृतदेह सापडल्याने या प्रकणावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी त्यांच्या पतीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याचाच हवाला देत विरोधी पक्षाने विधानसभेत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे.

या प्रकरणात पोलीस दलातील सचिन वाझे यांचं नाव समोर येत आहे तर मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे. यावर सर्व प्रकरणाचा तपास झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. परंतू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर आपली कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट विधानसभेचं कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला आहे.

मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध! प्रश्न कालपण तेच होते प्रश्न आजही तेच आहेत. जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तोपर्यंत विधानसभा ठप्प, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच पाटलांनी काही ट्विट केले आहेत त्यामध्ये त्यांनी सरकारला काही प्रश्नांची उत्तर विचारली आहेत.

दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा सचिन वाझेेंवरच का संशय?, हिरेन यांची आत्महत्या नाही हत्या झाल्याचं का वाटतं?, असे सवालही चंद्रकांत पाटलांनी केले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी, विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये”

‘पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की’.., अजित पवारांचे सूचक वक्तव्य

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

भाजपने चार वर्षापुर्वी तिकीट कापलेले तीरथ सिंह उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More