बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | राजनितीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीमुळे देशात तिसऱ्या आघाडीबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला हाणल आहे.

2024मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. मात्र भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. कोल्हापूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला.

एकाने मारायचं आणि दुसऱ्यानं समजवायचं असा खेळ सध्या राज्य सरकारमध्ये सुरू आहे. हा खेळ न कळण्या इतपत महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही.  याची शिक्षा ठाकरे सरकारला निवडणुकीत मिळेल. सरकारच्या या नाटकाला जनता विटली असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजप खासदार प्रीतम मुंडेंना मंत्रिपद मिळालं का नाही?, यावरही पाटलांनी भाष्य केलं.

दरम्यान, प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदं दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही पदं दिलं. राजकारणताही सेम आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-  

“माझ्या पक्षाचं काम करताना कोणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही”

उद्धवजी, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा- अतुल भातखळकर

मी राजकियदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे- उद्धव ठाकरे

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

…त्यामुळे पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More