बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…पण अजित पवारांनी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असं धुडकावल्यासारखं सांगू नये”

मुंबई | एसटी विलिनीकरणाचा तिढा सुटण्याऐवजी वाढतचं चालला आहे. राज्य सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील जनतेचे मात्र हाल होतं आहेत. त्यातचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही, असं स्पष्ट केलं आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील (Chandrkant Patil) यांनी अजित पवारांंना सल्ला दिला आहे.

“अजित पवारांच्या परखडपणाचा अभिमान आहे. पण त्यांनी विलिनीकण डोक्यातून काढून टाका, असे धुडकावल्यासारखे सांगू नये. विलिनीकरण का शक्य नाही हे समजून सांगावे. जीवन प्रधिकरणाचे विलिनीकरण केले तर एसटीचे का करता येत नाही? हे सुद्धा समजावून सांगावे,” असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला आहे.

“राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानभूतीने विचार केला पाहीजे. उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उत्पन्नाचे कारण पुढे केले आहे. पण राज्याचे उत्पन्न मोठे आहे. कर्ज काढून निधी उभारता येऊ शकतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी, एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, एसटीचे विलिनीकरण अशा सर्व बाबतीत महाविकास आघाडी सरकार आर्थिक कारण पुढे करत आहे,” असंही चंद्रकातं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या विलिनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयाकडे आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विलिनीकरणावर अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी या समितीच्या अहवालाची वाट पाहत आहेत. त्यातच अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘एसटी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका’ अजित पवारांचा कर्मचाऱ्यांना इशारा

‘गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

‘राज्यात तिसरी लाट आलीच तर ती Omicronची असेल’; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

‘दोन बायका फजिती ऐका! ‘या’ पठ्ठ्यानं दोन्ही बायकांना निवडणुकीत आणलं निवडूण

आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More