Top News

आमच्यासोबत यायचं असेल तर ही अट मान्य करावी लागेल- चंद्रकांत पाटील

Loading...

मुंबई | गोरेगाव येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या पक्षाची भूमिका बदलत हिंदूत्वाची वाट धरली आहे. यामुळे आता मनसे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचं स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणं हे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला पाहिजे. हिंदुत्व व्यापक संकल्पना आहे. परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जर सत्तेच्या खुर्चीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आपली विचारसरणी विसरून एकत्र येत असतील तर मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी केलं होतं.

दरम्यान, हिंदुत्ववादी मतांमध्ये फुट पडावी यासाठी शरद पवार यांनीच राज ठाकरेंना प्रेरणा दिली असावी, असं भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेेब ठाकरे आहे”

मी मुख्यमंत्री होईन, असं वचन शिवसेनाप्रमुखांना कधीच दिलं नव्हतं- उद्धव ठाकरे

धर्माला हात लावला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन- राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या- 

भीमा-कोरेगाव दंगलीमागे फडणवीस सरकारचा हात; शरद पवारांचा गंभीर आरोप

“तुमचा फोन टॅप होतोय, भाजपच्या माजी मंत्र्यांनीच मला माहिती दिली”

शरद पवारांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने हटवली

आमच्यासोबत यायचं असेल तर ही अट मान्य करावी लागेल- चंद्रकांत पाटील

मी मुख्यमंत्री होईन, असं वचन शिवसेनाप्रमुखांना कधीच दिलं नव्हतं- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या