मुंबई | कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी व्हावी म्हणून कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणात कुणाचीही चौकशी करा आम्ही नाही घाबरत जा. कारण तुमचं सरकार कमी काळाचं आहे. त्यामुळे ज्याकाही चौकशा करायच्या आहेत त्या आटपून घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना ‘अर्बन नक्सल’ या शब्दाचा उल्लेख केला नव्हता आणि पाठीमागच्या काळापासून त्यांची विधाने विचारात घेतली असता ती विधाने परस्पर विरोधी आहेत. म्हणूनच आता त्यांची चौकशी व्हावी, त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जावं, अशी मागणी लाखे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारकडून एनआयएकडे देण्यात आल्यापासून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केंद्राच्या या निर्णयावर सडकून टीका केली.
ट्रेंडिंग बातम्या –
…तर सरकार बरखास्त होऊ शकतं- सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभेसाठी प्रचार
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीचा जबरदस्त स्टंट; व्हिडीओ व्हायरल!
हिम्मत असेल तर…; नवाब मलिकांचं मुनगंटीवारांना खुलं आव्हान!
‘बँक फोडून टाकेन’; नवनीत राणांना संताप अनावर
Comments are closed.