बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रपूर हळहळला! अवघ्या 35 वर्षीय डाॅक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

चंद्रपूर | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात चंद्रपूरमधील मेडिकल कॉलेजमधील एका 35 वर्षीय डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे

चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये संबंधित डाॅक्टर औषधी विभागात असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते. मृत झालेल्या या डाॅक्टराचं नाव डाॅ. प्रशांत चांदेकर असं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

डाॅ. प्रशांत यांना उपचारादरम्यान ऑक्सिजन पातळी खालावल्याने नागपूरला नेण्यात येत होतं. मात्र वाटतेच वरोरा शहराजवळ त्यांचा मृत्यू झाला.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना वाढीची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. 11 मेपर्यंत जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारावर पोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1667 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 28 मृत्यू जणांचा मृ्त्यू झाला आहे. जिल्ह्यात 60312 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. तर 42823 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर 16584 अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. आतापर्यंत 905 जणांचा मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

#सकारात्मक_बातमी | हृदयात बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बाळाने कोरोनाला केलं चितपट

“महाराष्ट्र लढवय्या, महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही”

“कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झालेत”

“येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार”

‘मी देशसेवा केली, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही’; जवानाचा काळजाला पाझर फोडणारा आक्रोश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More