Top News चंद्रपूर महाराष्ट्र

चिमुरड्यांवर काळाचा घाला! भरधाव वेगानं जाणारा पिकअप चिरडून गेला अन…

चंद्रपूर | घरासमोर चिमुरड्याचा खेळाचा डाव रंगात आला होता. मात्र अचानक रस्त्यावरून जात असलेल्या पिकअपचा ताबा सुटला अन होत्याचं नव्हतं झालं. भरधाव चाललेल्या पीकअपनं 3 लहान मुलांना चिरडलं. या दुर्घटनेत 7 वर्षांच्या चिमुरडीचा जाग्यावरच मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला. आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर मिश्रा कुटूंबीय राहतात. या घरातील तीन लहान भावंड रात्रीच्या सुमारास खेळात तल्लीन झालेले असताना अचानक रस्त्यावरून मालवाहतूक करणारा एक पिकअप व्हॅन जात होती.

मात्र पंढरी मेश्राम यांच्या घराजवळ पिक अप व्हॅन चालवणाऱ्या चालकाचा अचानक ताबा सुटला आणि गाडी थेट मेश्राम यांच्या अंगणात शिरली. या पिकअपनं अलेशा, अस्मित आणि माही यांना जोराची धडक दिली. या धडकेमध्ये चिरडलं जाऊन अलेशा या 7 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेत अस्मित मेश्राम ( वय 10) आणि माही रामटेके (वय 12)गंभीर जखमा झाल्या आहेत. स्थानिकांनी जखमी बालकांना त्वरित रूग्णालयात दाखल केलं. लहानग्या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानं मिश्रा कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून गोंडपीपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनानं ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या छातीत झालीय बुरशी; कोरोनाचं धक्कादायक वास्तव!

देशात कोरोनाचा हाहाकार, कालच्या दिवसातली धक्कादायक आकडेवारी….

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचा विचार चालू असतो”

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात, यादी तयार- बच्चू कडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या