चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

चंद्रपूर | वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सखुबाई कस्तुरे असं मृत महिलेचं नाव आहे. 

चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील पेंढुरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. 

मृतदेहाच्या बाजूला वाघाच्या पायाचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

दरम्यान, अवनीच्या मृत्यू प्रकरणाला एक आठवडा उलटला आहे. त्यातच ही घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर

-आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं?

-अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

-‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

-पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे- उद्धव ठाकरे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या