बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोले मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत, त्यांच्यामुळं सोनिया गांधी…”

मुंबई | देशाचे पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपनं काॅंग्रेसला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. राज्यभरात भाजपच्या वतीनं नाना पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. अशात आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे.

नाना पटोले हे खोटं बोलण्याचं काम करत आहेत. काॅंग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचं काम नाना करत आहेत. त्यांनी मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं नंतर प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात येताच त्यांनी गावगुंडाबद्दल बोलत असल्याचं म्हटलं आहे. नाना पटोले हे मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

मी नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलन केलं तर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण नानांनी जेव्हा 400 लोकांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केलं तेव्हा त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. नानांमुळं काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींची प्रतिमा जाण्याची वेळ आली आहे, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते ज्या गावगुंड मोदीबद्दल केलं होत तो मी आहे, असं म्हणत एका व्यक्तीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. तरीही हे प्रकरण मिटत असल्याचं दिसत नाही.

थोडक्यात बातम्या 

“कोल्हे देशाची माफी मागा, अन्यथा…” तीन तरुणांनी जाहीर केली भूमिका

Gold Price: सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

‘…तोपर्यंत शाळा सुरु करण्यास मोठा धोका’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मराठमोळा पुष्पा! अल्लू अर्जुनच्या मराठी ट्रेलरचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा व्हिडीओ

Instagramद्वारे आता कमवा बक्कळ पैसा, कंपनीनं केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More