बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कधीही निवडणुका घ्या, विजय आमचाच होणार…सत्ता भाजपचीच येणार”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून आरक्षणावरून जोरदार गोंधळ झालेला पहायला मिळाला आहे. मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणावरून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून जोरदार टीका केली आहे.

ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकवणं गरजेचं आहे. आरक्षण नाही टिकलं तर ते सर्व अपयश हे सरकारचं असेल, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. परिणामी वाद वाढला आहे.

सरकार ओबीसी आरक्षणाच्या नावावर निवडणुका पुढं ढकलत आहे. उद्या, परवा, एक महिन्यानंतर, सहा महिन्यानंतर कधीही निवडणुका झाल्या तर भाजपची सत्ता येणार आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत. भाजपची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. राज्यात सर्वात जास्त जागा आम्हीच जिंकू असा विश्वास यावेळी बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं होतं. त्यानंतर राज्यात इम्पेरिकल डाटाचा गोंधळ सुरू झाला. डाटा व्यवस्थित नसल्याच्या कारणावरून सध्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.

थोडक्यात बातम्या – 

महागाईवर ‘ऑल इस वेल’ म्हणणाऱ्या अर्थमंत्री सीतारामण यांच्यावर राष्ट्रवादीची जोरदार टीका!

“मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणारच…”, नवनीत राणा कडाडल्या

शेतकऱ्यांनो… कामं उरकून घ्या! मराठवाड्यासह राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

“नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या”

धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More