मुंबई | महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केलीये. बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप थोरात यांनी केलाय.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीजबिलासंदर्भातील तक्रारी उर्जामंत्र्यांनी सोडवल्या आहेत. नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करतायत.”
“लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प असून सरासरी बिल देण्यात आलं. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊतही हतबल आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देतायत,” असा आरोप बावनकुळे यांनी केला होता.
ठाकरे सरकारने वीज बिलांबाबत सामान्यांना दिलासा असं सुरुवातीला सांगितलं होतं, मात्र नंतर बीलं भरावी लागतील असं जाहीर केलं. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.
महत्वाच्या बातम्या-
ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी
कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय; पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन
“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”
वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस
वीज बिलांवरुन नितेश राणेंची ठाकरे सरकारवर खोचक टीका, म्हणाले…
Comments are closed.