बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नादाला लागू नका’; भाजप नेत्याचा विरोधकांना इशारा

मुंबई | भाजप प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad pawar) थेट इशाराच दिला आहे. नरेंद्र मोदीचं कतृत्व आणि नेतृत्व खूप मोठं आहे. अशा नेत्याची बरोबर तुम्ही करु शकत नाही. शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादाला लागू नये, असा इशारा माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी दिला.

नितीश कुमार(Nitish kumar) आणि शरद पवारांच्या भेटीवर आपलं मत मांडताना बावनकुळे म्हणाले, “त्यांच्या कितीही भेटी होऊ द्यात. चौथी, पाचवी, सहावी कितीही आघाड्या होऊ देत. त्यांना त्यांची आघाडी लखलाभ असो”

ज्या पक्षाचे दहा खासदार निवडून येत नाहीत. ज्या पक्षाचे साठच्यावर आमदार निवडून येत नाही. त्यांनी दिवसा स्वप्न (Dream) बघू नये, असा टोलाही पवारांना बावनकुळेंनी लगावला.

नितीश कुमारांनी तिकडे दगाबाजी केली आणि इकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackery) केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देऊ, असंही पुढं बावनकुळे म्हणालेेेेेेेेेेेेेत.

थोडक्यात बातम्या

‘…म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नादाला लागू नका’; भाजप नेत्याचा विरोधकांना इशारा

IRCTC Thailand Tour Package | आता थायलंड फिरा अत्यंत कमी पैशात, IRCTC देतंय सुवर्णसंधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More