नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मैदानात येवून निवडणूक लढवण्याचं खुलं आव्हान भीम आर्मी संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना दिलं आहे. नागपूरमधील भीम आर्मी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
संघप्रमुखांनी मैदानात येऊन निवडणूक लढवावी. लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढवू नये. स्वतः मैदानात यावं. आरएसएसच भारतीय जनता पक्ष चालवत असल्याचं चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे.
देशाच्या पंतप्रधानांनी देखील लोकांचा सन्मान ठेवावा, त्यानंतरच त्यांनी माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा करावी. देश कुणाच्या बापाचा नाही, असं म्हणत आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, सरकारं बदलतात, पण विचार बदलत नाही. बहुजन समाजाची मतं सर्वांना हवी आहेत, पण आपल्याविषयी कोणी बोलणार नसल्याचं आझाद यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कुणालाही नको असलेली खाती मी मागून घेतली- आदित्य ठाकरे
…त्यांनी आपले आक्रमण अजून पाहिलेले नाही- राधाकृष्ण विखे पाटील
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही- उदयनराजे भोसले
“ट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी उभी राहिली तर 1 कोटी लोक नक्की जमा होतील”
केवळ शिवसेनेने नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा; काँग्रेस खासदाराचा घरचा आहेर
Comments are closed.