नागपूर महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणतात…

वर्धा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांपुरताच मर्यादित आहे आणि अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद झाली आहे, अशी बोचरी टीका उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेतृत्व कोणी करावं?, याबाबत एक-एक महिना निर्णय होत नाही. ज्या पक्षाला अध्यक्षच नाही त्या पक्षाची हीच अवस्था होणार, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

काँग्रेसला अध्यक्षच नसल्याने मोठ्या नेत्यांपासून ते गावातील कार्यकर्तेही काँग्रेस सोडून सेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाईट दिवसातही राज्याला चांगलं ठेवण्याचं काम केलं, असं म्हणत बावनकुळेंनी फडणवीसांच्या कामांचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नेत्यांच्या भरवशावर बसू नका; अण्णा हजारेंचा दिपाली सय्यद यांना सल्ला

-शाहरूख खानचा मुलगा करतोय ‘या’ मुलीला डेट?

-काँग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री पुन्हा अडचणीत; भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा दाखल!

-साहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही; म्हणून जिथे आहात तिथेच रहा!

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; शिवेंद्रराजे लवकरच भाजपात जाणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या