महाराष्ट्र यवतमाळ

“पूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख गप्प का?”

photo credit- anildeshmukh/facebook chandrashekharbavankule/facebook

यवतमाळ | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यासोबतच काही ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षानेही हे प्रकरण लावून धरलं आहे. याप्रकरणावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चवव्हाण आत्महत्या प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख पुढे येऊन का बोलत नाहीत?, पूजा चक्कर येऊन पडल्याचं पोलीस सांगत आहेत. मग पोलीस त्यासंदर्भात प्रेस रिलीज का काढत नाही?, कॅबिनेट मंत्र्यांचं नाव याप्रकरणात घेतलं जात आहे. तरीही याप्रकरणावर पोलीस महासंचालक समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

लहान लहान गोष्टींवर भाष्य करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री समोर येतात आता ते यावर गप्प का?, असा सवाल बावनकुळे यांनी अनिल देशमुखांना विचारलाय. विदर्भातल्याच मंत्र्यांचं नाव समोर येत आहे. गृहमंत्री ही विदर्भातलेच आहेत. या प्रकरणाच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात हा मंत्री चक्क पुरावे नष्ट करायला सांगत आहे. यापेक्षा आणखी कोणते पुरावे पोलिसांना हवे आहेत. हे सरकार मंत्र्याच्या पाठिशी उभे असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचं काम सुरू आहे. असे आरोप करत राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जे सध्या राज्यात सुरू आहे ते कायद्याच्या चौकटीत नाही. या प्रकरणाची लवकर चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची माहिती समोर आली नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर मीच आत्महत्या करेन’; पूजा चव्हाणचे वडील आक्रमक

…तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल- रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ढोंगीजीवी- नाना पटोले

जेनेलिया देशमुखने शेअर केला बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ, पाहा व्हीडिओ

“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या