नागपूर | जमीन संपादनात चूक झाली असेल तर धर्मा पाटलांना व्याजासह मोबदला देऊ, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. धर्मा पाटलांच्या मृत्यूनंतर नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
2009 ते 2015 या काळात जो अन्याय झाला तो आता होणार नाही, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं आपण धर्मा पाटलांच्या मुलाला सांगितलं आहे, असं बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचं पूनर्मुल्यांकन करण्याचे आदेश दिलेत. मंगळवारी अहवाल आल्यानंतर 10 लाख रुपये प्रति हेक्टर मोबदला देता येईल का? याचा विचार करु, असंही ते म्हणाले.
Comments are closed.