नागपूर | महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारच्या नव्या निर्णयानं सुखद धक्का बसणार आहे. दिवाळीत बंद झालेलं भारनियमन दिवाळीनंतर पुन्हा सुरु होणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
राज्यातील वीजेची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.
वीजपुरवठ्यासाठी कोळशाचं योग्य नियोजन केलं आहे. शिवाय सध्या थंडीचे दिवस असल्याने वीजेची मागणी कमी आहे, त्यामुळे भारनियमन होणार नाही, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ऑक्टोबर हीटमुळे राज्यात वीजेची मागणी वाढली होती. त्यामुळे लोडशेडिंग सुरू करण्यात आली होती, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्यासाठी पाठपुरावा करु!
-भाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला?; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…
-सिंचन घोटाळा प्रकरण; अजित पवारांबाबतची भूमिका न्यायालयात मांडू- मुख्यमंत्री
-प्रशांत किशोर यांचं नवं भाकीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी झटका!
-भारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल!
Comments are closed.