बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेतृत्व जातीमुळे नव्हे तर कर्तृत्वाने मोठं होतं; बावनकुळेंचा पंकजा मुंडेंना टोला

मुंबई | पंकजा मुंडेंनी कालच्या भाषणात त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली. त्यांनी ओबीसी समाज पक्षावर नाराज आहे, असं म्हटलं नाही. भाजपच्या नेत्यांनी ओबीसी समाजासाठी भरपूर काम केलं आहे.  ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे पक्ष त्यांना पद देतो. जातीमुळे नाही, कर्तृत्वामुळे माणूस मोठा होतो, असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाने ओबीसी समाजावर अन्याय केल्याचं बोलून दाखवलं. त्यानंतर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोणत्याही समाजाला संधी मिळाली नाही, असं झालं नाही. माणसं समाजाचं नेतृत्व करतात. माणूस जातीमुळे नव्हे तर कतृत्वाने मोठा होतो. सरकार न आल्याने जातीचं राजकारण होत आहे, असा आरोप बावनकुळेंनी केला आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या या आरोपाला पंकजा मुंडे काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More