‘उद्धवजी तुमचं बाळ कुठं गेलं?’; भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना डिवचलं
नवी दिल्ली | जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली आहे.
सर्वपक्षीय बैठकीला संरक्षण मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. मात्र महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. यावरून भाजप नेत्याने टीका केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
जी 20 ची बैठक सोडून उद्धव ठाकरे आणि अजित दादा हे राजकीय बैठका घेत होते. उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिला आहात, उद्धवजी तुमचं बाळ कुठं गेलं?, असा सवाल बावनकुळेंनी केलाय.
परिषदेला तुम्ही का उपस्थित राहिले नाहीत परिषदेला? अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्री राहिला आहात, तुम्हीही का उपस्थित राहिले नाही परिषदेला?, असं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.