नागपूर | नागपूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येणार. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी गरज भासल्यास शिवसेनेला सोबत घेता येईल, पण तो निर्णय सेनेनं घ्यायचा आहे, असं म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे शिवसेना नागपूरमध्ये भाजपसोबत जाणार का हा प्रश्न आहे.
नागपूर जिल्हा परिषदेसाठी मतदान होत आहे. आमचाच विजय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर देखील भाष्य केलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने खातेवाटपात विदर्भावर अन्याय केला आहे. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील दुय्यम खातं दिलं. यामुळे नाराज विजय वडेट्टीवार भाजपत आलेच तर त्यांचं स्वागत, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला जयंत पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर!
मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, पण…- राजू शेट्टी
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या लेकीचा गिटार वाजवत गातानाचा व्हिडीओ व्हायरल! पाहा व्हिडीओ – https://t.co/77uQ7n2Alq @msdhoni @BCCI #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 7, 2020
ट्वीट केल्याचे पैसे मिळाले का?; तिच्या प्रश्नावर तापसीचं खोचक उत्तर – https://t.co/05s5HUH0ET @taapsee #JNUTerrorAttack #JNUHiddenTruth #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 7, 2020
“फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला”- https://t.co/jlx4CgzS80 @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) January 7, 2020
Comments are closed.