नागपूर महाराष्ट्र

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

नागपूर | लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही विजय निश्चित मिळवू, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

भाजप हे 365 दिवस 24 तास अविरत आमचं मिशन सुरुच असतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नागपुरात शनिवार-रविवार राहणार आहेत. त्यांचं निवासस्थान, त्यांचा मतदारसंघ हा आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याचा आणि मनपा मिशनचा काही संबंध नाही. भाजपचं मिशन सुरुच असतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही 15 दिवसातून नागपूरला यायचे. आताही ते येतात. यापूर्वी ते 15 दिवसातून यायचे आता ते आठवड्याला येणार आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

भाजप नेहमीच निवडणुकीच्या तयारीत असते, नागपूर महापालिका निवडणूक पुन्हा जिंकणार आणि विधानसभा निवडणूक केव्हाही होवो, विदर्भातील 62 पैकी 50 पेक्षा जास्त जागा जिंकू, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

विदर्भ जेव्हा भाजपला मदत करते, तेव्हाच सत्ता येते हे अनेकवेळचं उदाहरण आहे. म्हणून यावेळी भाजपने 50 प्लस हे मिशन ठेवून काम सुरु केलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा- देवेंद्र फडणवीस

…तर सरकारचे 5500 कोटी वाचतील आणि 1 कोटी लोकांना फायदा होईल- आदित्य ठाकरे

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”

“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या