मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वीज घालवा आणि दिवे लावा या आवाहनावर आता महाराष्ट्राच्या आजी माजी उर्जामंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. उर्जामंत्री नितीन राऊत हे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. लाईट बंद करण्याने कुठलाच तांत्रिक अडथळा येणार नाही, असं म्हणत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊत यांचा दावा खोडून काढला आहे.
जर एकाच वेळी सगळ्यांनी वीज घालवली तर तांत्रिक परिणाम होऊन राज्याच्या वीज निर्मिती प्रकियेला अडथळा येण्याची शक्यता आहे, अशी भिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता बावनकुळएंवर टीका केली आहे.
राज्य सरकारकडे पंतप्रधानांच्या आवाहनासंबंधात तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्यांनी तशी तयारी करावी. मात्र उर्जामंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करणं थांबवावं, असं बावनकुळे म्हणाले आहेत
गेल्या 5 वर्षांत अनेक वेळा वीज घालवली आहे. मी ही राज्याचा उर्जामंत्री होतो. त्यामुळे मलाही त्यातील तांत्रिक गोष्टी समजतात, असंही बावनकुळे म्हणाले आहेत. तर मोदींनी त्यांच्या आवाहनाचा पुनर्विचार करावा, असं राऊत म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“मोदीजी, पहिलं देशातील गद्दारांवर सर्जिकल स्टाइक करा”
मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे- राज ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
“निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?”
देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर असल्या लोकांना गोळ्या घालायला पाहिजेत- राज ठाकरे
कोरोनामुळे जगातील सर्वांत मोठी आर्थिक मंदी; आयएफएमचं जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं भाकित
Comments are closed.