Chandrashekhar Bawankule | राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार राज्यात दंगली घडवण्याचं काम करत असल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत. महाराष्ट्रात शरद पवार हे दंगली घडवण्याचं काम करत असल्याने यामागचा नेमका हेतू काय आहे? असा सवाल आता चंद्रशेखर बावनकुळेंना उपस्थित केला आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी बावनकुळेंनी मराठा आरक्षणावरून शरद पवारांना टार्गेट केलं आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणामागे आणि आंदोलनामागे मनोज जरांगे पाटील आहेत. मात्र मनोज जरांगे हे शरद पवारांचा बोलता धनी असल्याचं सत्ताधारी अनेकदा टीका करतात. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रात दंगली होतील अशी परिस्थिती कधीही निर्माण होणार नाही. काही लोकं समाजात तेढ निर्माण होईल, अशी काही आंदोलनं होताना दिसत आहेत.
शरद पवारांनी पुढाकार घ्यावा
समाजाला विचलित करण्याचं काम काही लोकं करत आहेत. समाजासमाजात तेढ निर्माण होत आहे. हे थांबवण्यासाठी शरद पवारांनी यामध्ये पुढाकार घ्यावा. शरद पवारांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. त्यांच्या मनात काय आहे, हे माहिती नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.
काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करून वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच बावनकुळेंनी एक मोठी घोषणा केली आहे. महायुतीमधील तिन्ही नेते काम करत आहेत. एकत्र चर्चा करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचं सरकार येईल. तेव्हा हे सरकार गरीब कल्याण योजना राबवणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
फडणवीसांना व्हिलन केलं जातंय
प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणावरून वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या अनुषंगाने बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलले असतील. देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केले जात आहे. त्यांची उंची कमी केली जात असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.
News Title – Chandrashekhar Bawankule Slam To Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक”; संजय राऊतांची टीका
पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं थैमान; खडकवासलातून विसर्ग वाढवला
पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढला; आणखी 9 रुग्ण आढळल्याने खळबळ
“..ते सगळं ऐश्वर्याला कधीच मान्य नव्हतं”; सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर
SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ करा झटपट अर्ज