“अजितदादा कधी रडतात तर कधी 8-8 दिवस फोन बंद करून पळून जातात”

मुंबई | विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी सभागृहात तुफान फटकेबाजी केली.

यावेळी बोलताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उद्देशून अनेक टोले लगावले. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा नामोल्लेख टाळत टीकाही केली होती.

चंद्रशेखर बावनकुळेंनी सप्टेंबर महिन्यात बारामतीत बोलताना केेलेल्या वक्त्यावरून अजित पवारांनी टीका केली. बारामतीत राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा दावा बावनकुळेंनी केला होता. या दाव्यावर अजित पवारांनी सडकून टीका केली.

मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल, असा इशारा अजित पवारांनी दिला. अजित पवारांच्या टीकेला आता चंद्रशेखर बावनकुळेंनीही प्रत्युत्तर दिलंय.

अजितदादा कधी रडतात तर कधी 8-8 दिवस फोन बंद करून पळून जातात. माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असा घणाघात बावनकुळेंनी केलाय.

दरम्यान, अजित पवारांनी विरोधीपक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत पाटलांना द्यायला हवं होतं. आगामी 2024 निवडणुकीत अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा सुतोवाच बावनकुळेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-