बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चांद्रयान-3 ला केंद्र सरकारची मंजुरी; इस्रो प्रमुख के. सिवन यांची माहिती

नवी दिल्ली | केंद्र सरकारने चांद्रयान- 3 ला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे. तसेच 2020 मध्येच ही चांद्रमोहिम आखण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी सांगितलं आहे.

चांद्रयान-2 प्रमाणेच चांद्रयान-3 मोहिम असणार आहे. दोन्हींमध्ये फारसा फरक नसेल. चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर, रोव्हर आणि लँडर होते. चांद्रयान- 3 मध्ये प्राॅप्लशन मोड्यूलच्या साहाय्याने लँडिंग आणि रोव्हरचं काम चालेल, अशी माहिती के. सिवन यांनी दिली आहे. त्यामुळे नवीन वर्ष इस्त्रोसाठी महत्वाचं असणार आहे.

सतीश धवन अंतराळ केंद्रामधून 22 जुलै 2019 ला चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. 28 ऑगस्टला या यानाने यशस्वीरित्या चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला. मात्र, चंद्रावर पोहोचण्यासाठी काही कालावधी असतानाच या यानाचा संपर्क तुटला होता.

दरम्यान, नव्या वर्षात इस्रोनं चांद्रयान- 3 ची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्याचं इस्रोसमोर आवाहन असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More