मोदींवर बांगड्या फेकणाऱ्या महिलेला काँग्रेसकडून उमेदवारी?

मोदींवर बांगड्या फेकणाऱ्या महिलेला काँग्रेसकडून उमेदवारी?

अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कथित बांगड्या फेकलेल्या महिलेला काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याचं कळतंय. चंद्रिका सोलंकी असं या महिलेचं नाव आहे. 

22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करत असताना चंद्रिकाने त्यांच्या दिशेने काही वस्तू फेकल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं.

जिग्नेश मेवानीने ट्विट करुन तिने मोदींच्या दिशेने बांगड्या फेकल्याचं सांगितलं होतं. 45 हजार आशा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीने हा प्रकार केल्याचंही सांगितलं होतं. 

दरम्यान, काँग्रेस तिच्या हिमतीला दाद देणार असल्याचं कळतंय. बडोद्यातील जागेसाठी चंद्रिकाला उमेदवारी मिळू शकते.  

Google+ Linkedin