कोल्हापूर महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ‘हे’ माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात!

कोल्हापूर | राज्याचे सार्वजनिक बांधकाममंंत्री चंद्रकांत पाटील हे जिथून निवडणूक लढवणार त्यांच्याविरोधातच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी घोषणा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचित बहुजन विकास आघाडीकडून आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपकडून मोठ्या प्रमाणात जातीयवाद पसरवण्यात येत आहे. आरएसएसच्या माध्यमातून हे विष पसरवण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील हे आरएसएसचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ओबीसींसाठी त्यांना दोन नेते उभे करता आले नाहीत. म्हणून त्यांना केंद्रातून आणि राज्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्यांच्याविरोधात उभं राहणार, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

PMO च्या ‘त्या’ ट्विटमुळं जितेंद्र आव्हाडांचा पहिल्यांदा बसला PMOच्या म्हणण्यावर विश्वास

लोकसभेत राजकीय वातावरण तापलं तर बर्फाच्या वर्षावाने ‘दिल्ली’ गारठली!

तुमची 55 वर्षे आणि माझे 55 महिने करा तुलना, पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान

काँग्रेसला अंहकारामुळं 400 जागांवरून 40 वर यावं लागलं- नरेंद्र मोदी

-मी माझ्या मर्यादेतच आहे- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या