बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मेट्रोच्या ट्रायल रनवरून चंद्रकांत पाटील भडकले; अजित पवारांवर निशाणा साधत म्हणाले…

पुणे | भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रोचं पहिलं ट्रायल रन घेण्यात आलं. मेट्रोच्या ट्रायल रनवेळी कोणत्याही भाजप नेत्याला आमंत्रण देण्यात आलं नाही. तसेच कार्यक्रम पत्रिकेत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला नाही. यावरुनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मेट्रोला मंजुरी मोदींनी दिली. पैसे फडणवीसांनी आणले अन् ट्रायल रनला अजित पवार. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावणं अपेक्षित होतं. महाविकास आघाडी सरकार फसवं आहे. जनता लवकरच निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल.

तसेच माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होऊन देखील मला आमंत्रण दिलं नाही. मेट्रो कोणाच्या दबावाखाली काम करत असेल तर आम्ही देखील खूप दबाव आणू शकतो, असा देखील इशारा पाटील यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा घेऊन राज्यातील रिक्त जागा भरण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं? अजित पवारांसारख्या शब्दाला पक्का असणाऱ्या माणसानेसुध्दा शब्द पाळला नाही, अशी देखील टीका पाटलांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

ह्रदयद्रावक! पुण्याच्या वेदिका शिंदेचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अखेर मुहूर्त ठरला! उद्या दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर

सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More